भाजपच्या पराभवासाठी एकत्र काम करणार – राहुल गांधी 

file photo

नवी दिल्ली: तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायदू यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. भाजपच्या पराभवासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे काम करतील, असे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

देशातील लोकशाही संस्थांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी हे विरोधी पक्ष निश्‍चित प्रयत्न करतील. बेरोजगारी आणि राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचार या सर्वात महत्वाच्या मुद्दयांवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. देशात भ्रष्टाचार होतो आहे, ही उघड बाब आहे. तपास करणाऱ्या संस्थांवरच हल्ले होत आहे. काय झाले आहे, कोणी भ्रष्टाचार केला, याचा तपास व्हायला हवा. यातील तथ्य समोर यायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले. अन्य विरोधी पक्षांबरोबर चर्चा झाल्यावर विरोधी आघाडीची रणनिती निश्‍चित केली जाईल, असे चंद्रबाबू नायडू यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)