भाजपच्या नाराज सिन्हांची ममतांनी घेतली भेट

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजपचे नाराज नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांची भेट घेतली. या भेटीवेळी सिन्हा यांनी मोदी सरकारविरोधात प्रादेशिक शक्तींना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केल्याचे समजते.

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममतांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा सपाटा लावला आहे. मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आदींची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी मोदी सरकारविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करून स्वपक्षाची गोची करणाऱ्या दोन्ही सिन्हांची भेट घेतली. ममता या आमच्या वाजपेयी सरकारमधील जुन्या सहकारी आहेत. देशाच्या बचावासाठी त्यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. भविष्यातही आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असे त्यांच्या भेटीनंतर यशवंत सिन्हा पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मात्र, भाजपच्या विरोधातील आघाडीत ते आणि शत्रुघ्न सिन्हा सहभागी होणार का, या प्रश्‍नावर उत्तर देणे त्यांनी टाळले.

दरम्यान, ममतांनी वाजपेयी सरकारमधील माजी मंत्री अरूण शौरी यांचीही भेट घेतली. मोदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शौरी यांनी भाजपच्या विरोधात एकास एक लढत देण्याच्या सुत्राचे स्वागत केले. हे सूत्र अंमलात आणले गेल्यास विरोधकांना 69 टक्के मते मिळतील, असे त्यांनी म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)