भाजपच्या दीप्ती गांधी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

निवडणूक महासंग्रामातील 73 उमेदवार कोट्याधीश 177 लखपती

नगर –  महापालिका निवडणुकीच्या महासंग्रामाच्या रणांगणात उतरलेल्या 340 उमेदवारांपैकी 73 उमेदवार हे कोट्यधीश आहेत. तसेच यापैकी 177 उमेदवार हे लखपती आहेत. त्यात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या सूनबाई आणि नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या पत्नी दीप्ती गांधी आहेत. रिंगणातील 250 उमेदवारांकडे लाखोंची मालमत्ता असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे. राजकीय पक्षांनीदेखील कोट्यधीश, लक्षाधीश असणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी दिले असल्याचे यावरून दिसून येत आहे.

नगर महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. त्याचबरोबर उमेदवारांनीही आपल्यापरीने विविध फंडे आजमावून पाहिले. त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले आहे. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या सुनबाई दीप्ती गांधी प्रथमच निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्या एकूण उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे तब्बल 17 कोटी 26 लक्ष 60 हजार 389 रूपयांची संपत्ती आहे, जी की, महासंग्रामात उतरलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्याकडे विविध बॅंका तसेच संस्थांचे 16 कोटी 16 लक्ष 7 हजार 860 रूपयांचे कर्जही असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

खा. गांधी यांचा मुलगा नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्याकडे 1 कोटी 71 लक्ष 60 हजार 389 रूपयांची संपत्ती आहे. याखालोखाल भाजपच्या उमेदवार असलेल्या महेंद्र मोहनीराज गंधे यांच्याकडे 11 कोटी, 93 लक्ष, 65 हजार, 908 रूपयांची संपत्ती आहे. सुवर्णा विजय बोरूडे- 9 कोटी 64 लक्ष, 79 हजार, 997 रूपये, गायत्री नरेंद्र कुलकर्णी- 7 कोटी, 37 लक्ष,53 हजार, 635 रूपये, बाबासाहेब वाकळे- 6 कोटी 82 हजार, 899 रूपये, किशोर डागवाले- 2 कोटी, 33 लक्ष, 19 हजार,674 रूपये, दत्तात्रय कावरे- 2 कोटी, 45 लक्ष, 84 हजार, 546 रूपये, अंजली जितेंद्र वल्लाकट्‌टी- 5 कोटी 22 लक्ष, 89 हजार, त्याचबरोबर शिवसेनेच्या उमेदवार पुष्पा निवृत्ती वाकळे- 11 कोटी, 85 लक्ष, 43 हजार, 327 रूपये, पुष्पा अनिल बोरूडे- 8 कोटी, 76 लक्ष, 2 हजार, 267 रूपये, बाळासाहेब बोराटे- 7 कोटी, 24 लक्ष, 85 हजार, 924 रूपये, भगवान फुलसौंदर- 4 कोटी 60 लक्ष, 63 हजार, 62 रूपये, सुभाष लोंढे- 3 कोटी, 77 लक्ष, 16 हजार, 742 रूपये,

महापौर सुरेखा कदम- 2 कोटी 47 लक्ष, 72 हजार, 759 रूपये, योगीराज गाडे- 10 लक्ष 38 हजार, 737 रूपये, राष्ट्रवादीचे डॉ. यागेश चिपाडे – 3 कोटी, 34 लक्ष 98 हजार रूपये, अविनाश घुले- 1 कोटी 66 लक्ष, 53 हजार, 496 रूपये, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शितल जगताप- 7 लक्ष, 50 हजार, 651 रूपये, गणेश भोसले- 1 कोटी, 63 लक्ष, 63 हजार रूपये, निर्मला कैलास गिरवले- 1 कोटी, 3 लक्ष, 82 हजार रूपये, जितेंद्र गाडे- 1 कोटी, 68 लक्ष, 22 हजार, 752 रूपये, आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या ज्योती गाडे यांची संपत्ती 47 लक्ष, 26 हजार रूपये, तर कॉंग्रेसचे दीप चव्हाण यांची संपत्ती 1 कोटी, 42 लक्ष, 72 हजार रूपये, त्याचबरोबर शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्याकडे 5 कोटी 23 लक्ष, 78 हजार, 206 रूपयांची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)