भाजपच्या “घर चलो’चा कॉंग्रेसकडून निषेध

पिंपरी – भाजपच्या वतीने “घर चलो अभियान’ हा उपक्रम सुरु केला आहे. विकासाच्या नावाखाली नागरिकांना बेघर करुन फसवे “घर चलो अभियान’ राबविणाऱ्या शहर भाजपचा शहर युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष मयुर जैयस्वाल दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, भाजपने गेल्या काही वर्षात लोकांना बेघर करण्याचे काम सुरु केले आहे. राज्यात व केंद्रात भाजप सत्तेवर येऊन चार वर्ष पूर्ण होत आली आहेत. तसेच महापालिकेमध्ये भाजपला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरीही शहरातील प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघाला नसून हे सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. असे असताना देखील हे फसवे अभियान राबविले जात आहे. केंद्रातील युपीए व राज्यातील आघाडी सरकारच्या काळात जेएनयुआरएम प्रकल्पाच्या माध्यमांतून पिंपरी-चिंचवड शहरातील अल्प उत्पन्न धारक व झोपडपट्टी धारकांसाठी घरे निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले गेले.

घरकुल प्रकल्पामध्ये अल्प उत्पन्न धारकांसाठी 5976 घरे बांधण्यात आली व शहरातील गरीब सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर देण्याचे काम आघाडी सरकारने केले. उलट आता भाजपमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे 900 झोपडपट्टी धारकांची घरे तक्रार असून न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने अनेक झोपडपट्टीधारकांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. पिंपळे गुरव, रहाटणी, थेरगाव, कासारवाडी, बिजलीनगर आदी भागांतील सुमारे 3500 पेक्षा जास्त घरे बाधीत होत आहेत. या भागातील नागरिक प्रचंड तणावात असून तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. अनधिकृत बांधकाम, रिंग रोड, शास्तीकरांसारखे महत्त्वाचे प्रश्न व इतर अनेक समस्यांवर कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. रिंग रोडबाधित घरांच्या प्रश्नांवर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. अनधिकृत बांधकाम नियमित करु, शास्तीकर रद्द करु, अशी आश्वासने निवडणुकीच्या काळात भाजपने दिली होती. आता “घर चलो’ हे फसवे अभियान भाजप राबवत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)