भाजपच्या कार्यक्रमात पुन्हा प्रणव मुखर्जी

गुरगाव – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हरियाणात भाजप सरकारच्या कार्यक्रमात रविवारी त्यांनी उपस्थिती लावली. काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जींनी उपस्थिती लावली होती. त्यापूर्वी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रणवदांना कार्यक्रमात न जाण्याचा सल्ला दिला होता. त्यावरून कॉंग्रेस-भाजपत शाब्दिक फैरी झडल्या आणि मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेला काही महिने उलटत नाही तोच प्रणव मुखर्जी हे आता भाजपच्या कार्यक्रमात दिसून आले.

प्रणव मुखर्जी फौंडेशनच्या अनेक कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी मुखर्जी हे मुख्यमंत्री खट्टर यांच्यासोबत एका मंचावर एकत्र आले. मुखर्जी यांनी या कार्यक्रमासाठी संघाच्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रण दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या कार्यक्रमानंतर मुखर्जी यांच्या कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आले. प्रणव मुखर्जी फौंडेशन संघासोबत कुठलेही काम करत नाही आणि पुढील काळात तशी कुठलीही योजना नाही. स्मार्ट गाव योजनेनुसार दत्तक घेतलेल्या गावांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्रणव मुखर्जी फौंडेशन करत आहे.

यानुसार नागरिकांना प्रशिक्षण देणे, पाण्यासाठी एटीएम बसवणे आणि वैशिष्ट्‌यपूर्ण गोदामे सुरू करण्यात येणार आहेत.
हरियाणात जुलै 2016 मध्ये स्मार्ट गाव योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेनुसार राष्ट्रपती असताना प्रणवदांनी अनेक गाव दत्तक घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर हरियाणा सरकारच्या आमंत्रणावरून मुखर्जी यांनी गुरुग्राममधील कार्यक्रमात उपस्थिती लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)