भाजपच्या आमदाराने ममतांना म्हटले शूर्पणखा; तर कॉंग्रेसला रावणाची उपमा

लखनौ – वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी कॉंग्रेसची तुलना थेट रावणाशी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शूर्पणखा (रावणाची बहीण) म्हटले.

बलियामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रथमच आमदार बनलेल्या सिंह यांनी पश्‍चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून ममतांवर टीकेची झोड उठवली. भाजपशासित राज्यांमधील सर्व दहशतवाद्यांनी पश्‍चिम बंगालला पलायन केले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास बंगालचा एक दिवस जम्मू-काश्‍मीर होईल.

जम्मू-काश्‍मीरातून हिंदूंना बाहेर घालवण्यात आले. तसेच पश्‍चिम बंगालमध्ये घडेल. बांगलादेशातील दहशतवाद्यांनी पश्‍चिम बंगालमध्ये शिरकाव केला आहे. ते हिंदूंना त्रास देत आहेत. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान लाभणे हे आपले सुदैव आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालमधून परकी शक्तींना हटवण्यात आपण यशस्वी होऊ, असे ते म्हणाले. काही दिवसांपूूर्वीच मोदींनी भाजपच्या नेत्यांना वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे टाळावे, अशी सूचना केली होती. त्यानंतर काही दिवसांतच सिंह यांनी वादंग निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. याआधी उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी असणारे भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांचे समर्थन करून सिंह वादाच्या केंद्रस्थानी आले होते. याशिवाय, 2022 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र बनेल, असा दावाही त्यांनी केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)