भाजपच्या आणखी एका मित्रपक्षाची नाराजी चव्हाट्यावर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत, तशा मित्रपक्षांची वाढती नाराजी ही भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, तेलगु देसम पार्टी हे घटक पक्ष एनडीएतून बाहेर पडले आहेत. तर शिवसेना वारंवार इशारा देत आहे. आता आणखी एका मित्रपक्षाने भाजपवर नाराजी व्यक्त करत सूचक इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील घटकपक्ष असलेला सुहेलदेव भारतीय समाज पार्टीने भाजपपासून वेगळे होण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाचे अध्यक्ष आणि योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी इशारा दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचलेले राजभर म्हणाले, आम्ही आधी चर्चा करू आणि त्यानंतर आमच्या मागण्या मांडू. त्या मान्य झाल्या नाही, तर वेगळे होण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्याकडे नाही. राजकारणामध्ये कोणतीही युती ही अनंत काळासाठी कधीच नसते. तसेच राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीवेळी त्यांचा पक्ष भाजप उमेदवाराला मतदान करणार अथवा नाही यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)