भाजपचे सरकार केवळ घोषणाबाज सरकार- बाळासाहेब थोरात

मुंबई  -राज्यातील भाजपाचे सरकार हे घोषणाबाज सरकार असून केवळ जाहिराती करीत आहे अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी करत शेती, सिंचन, दूध आदी प्रश्नांवर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणात सरकारचे लक्ष वेधले. आमदार थोरात म्हणाले, खातेनिहाय चर्चा ही विधानसभेची परंपरा असून यामुळे त्या मंत्र्याला आपण केलेल्या कामाचा आढावा सदनात व जनतेसमोर मांडता येतो. परंतु सध्या या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही ही चिंतेची बाब आहे.

महसूल विभागाच्या धोरणाबाबत ते म्हणाले की, मुंबईत शासनाच्या जमिनी पुनर्विकसित करण्यासाठी प्रिमीअर 10 टक्क्यांहून 25 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. याबाबत मुंबईच्या लोकप्रतिनिधीही  चर्चा न करताच अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मागील 3 वर्षात काहीच काम होऊ शकले नाही. फ्लॅटच्या हस्तांतरणासाठी आकारण्यात येणाऱ्या 3 टक्के रेडीरेक्टर दरामुळे किमती वाढल्या आहे. त्यामुळे त्याची झळ नवीन खरेदी करणाऱ्यांना  सोसावी लागत आहे. सध्या सर्व शासकीय धोरणांवर पैसा उभा करण्याचा मोठा प्रभाव दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)