भाजपचे मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया – राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आरोप


302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी


धर्मा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधक आक्रमक

मुंबई – भाजपमधील मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेत. रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली असून रावल यांना धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. त्याचबरोबर त्यांना मदत करणारे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

धुळे जिल्ह्यातील विखरण देवाचे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. शिंदखेडामधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे 2009 मध्ये करण्यात आले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला.

त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. आणि योग्य मोबदला मिळाला नसल्यानेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. धर्मा पाटील यांच्या जमीन मोबदल्यासंदर्भात 22 जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक ठेवण्यात आली होती परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली, असा आरोप मलिक यांनी केला.

युपीए काळामध्ये ग्रामीण भागात चौपट मोबदला आणि शहरी भागात दुप्पट मोबदला देण्याचा कायदा झाला होता. परंतु 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने हा कायदा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कायदा मोदी सरकारला बदलता आला नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले. 2006 साली 4 हेक्‍टर जमीन बहाणे नावाचा गाव आहे. तिथे पंचरत्ना रावल या नावाने संपादीत जमीन घेतली. त्या जमीनीवर 1 कोटी रुपयांचा मोबदला घेतला याचे पुरावे आमच्याकडे आहेत.

याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आणि एसीबीकडे करण्यात आल्यावर कारवाईला सुरुवात झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव आणत ही कारवाई थांबवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. जयकुमार रावल आणि त्यांची कंपनी एखादया भूमाफियासारखी दहशत पसरवत आहे. शेतकऱ्यांना सोडत नाहीच आहे शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची 27 एकर जमीन बळकावली आहे. आज माजी राष्ट्रपतींना न्यायालयात दाद मागावी लागत आहे इतका धुमाकुळ सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)