भाजपचे ‘ते’ राष्ट्रवादी, इच्छुकांचे समर्थक 

समर्थकांत मोठ्या संख्येने महिलांचा समावेश

समर्थकासाठी मोजले पैसे

दैनिक प्रभातने यापूर्वी भाजप इच्छुक उमेदवारांच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांना 500 रुपये जोडी याप्रमाणे पैसे दिल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आजही त्या महिला राष्ट्रवादी इच्छुक उमेदवारांच्या समर्थक म्हणून आल्याचे आढळून आले. याचा अर्थात निवडणुकीत रोजगार या निमित्ताने उपलब्ध झाला आहे.

नगर – महापालिका निवडणुकीसाठी सध्या राजकीय पक्षांकडून मुलाखतीचे सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहे. या मुलाखतींसाठी इच्छुक उमेदवारांकडून जोरदार शक्‍तिप्रदर्शन करण्यात येत आहे. युवकांसह महिला समर्थक आणून नेत्यांना आपल्या मागे असलेली गर्दी दाखवून उमेदवारीसाठी दावा केला आहेत.आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाच्या कार्यालयात झाल्या. त्यावेळी भाजपचे ते राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचे समर्थक असल्याचे आढळून आले. विशेषतः महिलांची मोठ्या संख्येने उपस्थितीत समर्थक म्हणून दिसून आली.

-Ads-

सोमवार व मंगळवारी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाल्या. पहिल्या दिवशी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती. यावेळी इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्‍तिप्रदर्शन करून आपल्या मागे मोठा जनसमृदाय असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या गर्दीमुळे टिळक रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती. तीच स्थिती आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात झाली होती. इच्छुक समर्थकांसह वाहनामधून येत असल्याने नगर-पुणे रस्ता जाम झाला होता. दोन्ही बाजूंनी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राष्ट्रवादीचे कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवारांनी यावेळी जोरदार शक्‍तिप्रदर्शन केले होते. परंतू जे समर्थक भाजप इच्छुक उमेदवारांबरोबर आढळून आले तेच समर्थक राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मागे दिसले. भाजपच्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्या उमेदवारांचा जयजयकार केला. आज त्या समर्थकांनी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांचा जयजयकार केला. या समर्थकांमध्ये महिला मोठ्या संख्येने आढळून आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)