भाजपचे आज शक्‍तिप्रदर्शन

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विकास कामांचा धडाका

सातारा – आगामी लोकसभा निवडणुकांची राजकीय गणिते जुळवत भाजपने सातारा जिल्हयात विकास कामांचा बार उडवून दिला आहे. पुणे ते सातारा दरम्यान असणाऱ्या खंबाटकी घाटातील सहा मार्गिका बोगद्याचे कोनशिला अनावरणासह इतर तीन प्रकल्पांचा कोनशिला अनावरण समारंभ केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी दि. 23 डिसेंबर 2018 रोजी होत आहे. हा कार्यक्रम सोहळा येथील सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर सकाळी साडेदहा वाजता होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, महाराष्ट्र राज्य परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार उदयनराजे भोसले, यांची प्रमुख उपस्थिती आहे. हेळवाक कराड, सातारा ते म्हसवड रस्त्याचे दुपदरीकरण तसेच सातारा जिल्ह्यातील सीआरएफ काम, तसेच नॅशनल हायवे व एमएसआर अंर्तगत 134 किलोमीटरचे रुंदीकरण इ. कामांचे डिजिटल उद्‌घाटन एकाचवेळी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

सैनिक स्कुलच्या मैदानावर भाजप कार्यकर्ते व प्रशासन यांची एकच धावपळ सुरू असून या कार्यक्रमाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी भाजपा जिल्हा कार्यकारिणी दिवसभर शासकीय विश्रामगृहात तळ देऊन होती. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेतला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाची यशस्वीता आणि त्या अनुषंगाने राजकीय समीकरणांची जुळवाजुळव याकरिता हायकमांड कडून जिल्हा कार्यकारिणीला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गडकरी पेक्षा रोडकरी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या भाषणाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती राजकीय घोषणा करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)