भाजपची “सोशल’ मोर्चेबांधणी

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी “सोशल’ मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांच्या टीकांना प्रभावी प्रत्त्युत्तर देता यावे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या सोशल मीडिया सेलसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यामध्ये राज्यस्तरावरील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

भाजप पिंपरी-चिंचवड सोशल मीडिया सेलच्या वतीने सोशल मीडिया स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग “मोदी टू-ओके’ या मोहिमे अंतर्गत घेण्यात आला. यावेळी “मोदी टू-ओके’ या मोहिमेचे प्रमुख आशीष शर्मा, सोशल मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवांग दवे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मल्हार गंधे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस प्रमोद निसळ, सरचिटणीस सारंग कामतेकर, बाबू नायर, माजी महापौर आर. एस. कुमार, नगरसेवक शीतल शिंदे, राजू दुर्गे आदी उपस्थित होते. या अभ्यास वर्गात पक्षाची पुढील रणनिती आखली गेली. या प्रशिक्षण वर्गात सुमारे 200 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.

यावेळी लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन म्हणाले, “”सोशल मीडियावर विरोधकांना उत्तर द्यायचे त्यात काही चूक नाही. परंतु काही झाले तरी आपली पातळी खालवू देऊ नका”. या कार्यक्रमासाठी प्रा. संजीवनी पांडे व राजेश राजपुरोहित यांनी परिश्रम घेतले.

सोशल मीडिया 2014 प्रमाणेच 2019 निवडणुकांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून पाहण्याचा संकल्प भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केला पाहिजे. सोशल मीडियावर विरोधक जाणून-बुजून सरकारच्या कामाविषयी संभ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, त्यांना केवळ आकडेवारीनेच उत्तर देणार आहोत. कारण त्यावर ते काही उत्तर देऊ शकणार नाहीत.
– श्‍वेता शालिनी, प्रवक्‍ता, महाराष्ट्र प्रदेश, भाजप.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)