भाजपची ऑफर सन्मानजनक नाही : कुशवाह 

पाटणा: बिहारमध्ये एनडीएला तडे जात असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून या आघाडीतील राष्ट्रीय लोक समता पार्टीने भाजपवर तिकीट वाटपावरून जोरदार निशाणा साधला आहे. या संबंधात पक्षाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांनी म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आम्हाला ज्या जागांची ऑफर दिली आहे ती आम्हाला सन्मानजनक वाटत नाही.

कुशवाह हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी बिहार मधील एनडीएच्या जागावाटपावरून आज प्रथमच थेट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या पक्षाला नेमक्‍या किती जागा देऊ करण्यात आल्या आहेत, हे मात्र त्यांनी जाहीर केलेले नाही.

-Ads-

ते म्हणाले, की प्रत्यक्ष जागा वाटप 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतरच आम्ही त्यावर अधिकृत भूमिका घेऊ. पण सध्या तरी त्यांनी आम्हाला जितक्‍या जागा देऊ केल्या आहेत त्यावर आम्ही बिलकुल समाधानी नाही. कुशवाह आणि नितीशकुमार यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही. नितीशकुमार यांनी त्यांच्याशी जागावाटपावरून चर्चाही करण्यास नकार दिला आहे. नितीशकुमार यांचे समर्थन करणारे भाजपचे नेते सुशिलकुमार मोदी यांच्यावरही यावेळी कुशवाह यांनी तोंडसुख घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)