भाजपची अल्पसंख्यांकांना दुय्यम वागणूक!

पिंपरी – अल्पसंख्याक समाज हा शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्‌या मागासलेला समाज असल्याने या समाजाकडे देशातील काही पक्षाचे नेते केवळ “व्होट बॅंक’ म्हणून पाहतात. निवडणुकीत विविध अमिषे दाखवून मते पदरात पाडून घेतात व सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडतो. भाजप सरकार हे अल्पसंख्याक समाजाला नेहमीच दुय्यम वागणूक देण्याचे काम करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांनी आकुर्डी येथे केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक समाजाची आकुर्डी येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी अब्दुल मलिक बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक विठ्ठल काटे, भाऊसाहेब भोईर, जावेद शेख, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, सोहेल खान, शमीम पठाण, जगदीश शेट्टी, फजल शेख, महंम्मद पानसरे, प्रसाद शेट्टी, अरूण बोऱ्हाडे, विशाल वाकडकर, सुनील गव्हाणे, वर्षा जगताप, कविता खराडे, विश्रांती पाडाळे, विनोद कांबळे, रशीद सय्यद आदी उपस्थित होते.

-Ads-

अब्दुल मलिक म्हणाले, हिंदु-मुस्लिम वाद पेटवण्याचे षडयंत्र काही जातीयवादी लोक करीत आहे, त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला हा फार मोठा धोका आहे. भाजपच्या काळात संविधानाच्या प्रती जाळल्या जातात तरी देखील हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे आपला देश हा हुकूमशाही पध्दतीने चाललेला आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. देशात प्रचंड महागाई वाढली आहे, भ्रष्टाचार, महिला अत्याचारातील वाढ, चुकीचे कामगार धोरण, शेतकरी आत्महत्या, खून, बलात्कार अशा विविध घटनांमुळे भाजपवरील लोकांचा विश्वास संपूर्णपणे उडालेला आहे, असे मतही गफ्फार मलिक यांनी मांडले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)