भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधक देणार सामूहिक नेतृत्व

ममतांचे सूतोवाच : निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्‍यता कमी
नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडून सामूहिक नेतृत्व दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे निवडणुकीआधी विरोधकांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाण्याची चिन्हे नाहीत.

विरोधकांच्या या रणनीतीचे सूतोवाच आज पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केले. तीनदिवसीय दिल्ली दौऱ्यासाठी ममता दाखल झाल्या आहेत. पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून त्यांचेही नाव घेतले जात आहे. यापार्श्‍वभूमीवर, पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनणार का, असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी सामूहिक नेतृत्वाचे सूतोवाच केले.

दरम्यान, विरोधकांच्या ऐक्‍याचे दर्शन घडवण्यासाठी ममता 19 जानेवारीला कोलकत्यात विशेष सभेचे आयोजन करणार आहेत. त्या सभेचे निमंत्रण देण्यासाठी त्या उद्या (बुधवार) कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी आज भाजपला रामराम ठोकलेले नेते यशवंत सिन्हा, राम जेठमलानी यांच्याबरोबरच भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची भेट घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)