भाजपचा आजपासून दिल्लीत “कुंभमेळा’

2019चा शंखनाद

12 हजार पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविण्याचा गुरूमंत्र ऐकण्यासाठी देशभरातील हजारो कार्यकर्ते उद्या दिल्लीत दाखल होत आहेत. उद्या शुक्रवारपासून रामलीला मैदानात सुरू होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनरूपी कुंभमेळ्यात डुबकी लावण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

बऱ्याच विषयांवर चर्चा..
एकीकडे भाजपने पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत हातची तीन महत्त्वाची राज्ये गमाविली आहेत. तर दुसरीकडे, लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. अशात हे अधिवेशन होत असल्यामुळे येथे बऱ्याच विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. भाजपचे घटक पक्ष रालोआ सोडून गेले आहेत. शिवाय, राम मंदिराच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात अद्याप नियमित सुनावणी सुरू न झाल्यामुळे भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे.

2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनिती ठरविण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन उद्यापासून दिल्लीत सुरू होत आहे. 11 आणि 12 जानेवारी असे दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात केंद्र सरकारच्या साडेचार वर्षांतील कामकाज लोकांपर्यंत कसे पोहचवायचे यावर विचार विनिमय केला जाईल. उच्च जातीतील गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन पूर्ण केल्यामुळे भाजप उत्साहित आहे. “अब की बार, फिर मोदी सरकार’ ही या अधिवेशनाची थीम आहे.

अधिवेशनात देशभरातून जवळपास बारा हजार कार्यकर्ते गोळा होणार                                              अधिवेशन यशस्वी बनविण्यासाठी 24 विभाग बनविण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांना विमानतळ, रेल्वे स्टेशनहून आणण्यापासून ते त्यांना त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवाय रामलीला मैदानावर घेवून जाण्याचे काम चोखपणे बजावण्यास सांगण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे, प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील दहा जबाबदार नेत्यांना या अधिवेशनात बोलाविण्यात आले आहे. भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीची बैठक 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथे होणार आहे. याशिवय ओबीसी आघाडीची बैठक 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी पाटणा येथे बोलाविण्यात आली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)