भाजपकडे फक्त घोषणांचे कारखाने

खा. चव्हाण यांची टीका; संगमनेरमध्ये जनसंघर्ष यात्रा
संगमनेर – देशात व राज्यात फक्त घोषणाचे कारखाने असलेल्या भाजप सरकारकडे विकासासाठी पैसा नाही. राज्यातील शेतकरी, कामगार, महिला, युवक, आदिवासी,अल्पसंख्याक त्रस्त असून भाजपवाल्यांनो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र व देश माझा, अशी खोचक टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खा. अशोक चव्हाण यांनी केली.
जळगावहून निघालेली कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा संगमनेर येथे आली. तिथे मेळावा झाला. या मेळाव्यात खा. चव्हाण बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, नसीम खान, शरद रणपिसे, इब्राहिम भाईजान, भाऊसाहेब कांबळे, डॉ.सुजय विखे, हुस्नबानो खलिपे, शोभाताई बच्छाव, डॉ. राजीव वाघमारे, हेमलता पाटील, विनायक देशमुख, प्रकाश सोनवणे, सचिन सावंत, राजाराम पानगव्हाणे, अण्णासाहेब शेलार, शरयूताई देशमुख, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीतभाऊ थोरात, बाबा ओहोळ आदी उपस्थित होते.
खा. चव्हाण म्हणाले, की भाजपची 36 हजार कोटींची कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे.याउलट कॉंग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. राज्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.मंत्रालय आता आत्महत्यालय झाले आहे. व्यापारी, शेतकरी, युवक, कामगार, महिला सर्व त्रस्त आहेत. नगरचा छिंदम ते मुंबईचा कदम अशी भाजपची संस्कृती आहे. त्यांना सरकार चालवता येत नाही. त्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नगर जिल्ह्याला मोठी वैभवशाली परंपरा आहे. नगर जिल्ह्यात विखे आणि थोरात वेळ आल्यावर एकत्र येतात. दोघेही राष्ट्रीय कलावंत आहेत. आता ते एकत्र आले आहेत. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही. आमदार थोरात यांनी मंत्रिपदाच्या काळात सातत्याने गोरगरिबांसाठी काम केले आहे. कॉंग्रेस वाढीसाठी त्यांनी राज्यात मोठे काम केले आहे. सत्यजीत तांबेंच्या रुपाने युवकांसाठी कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष सहकारी मिळाला आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कृषी विकास दर 8.3 टक्‍क्‍यांनी घटला आहे. राज्यातील 49 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. “मेक इन महाराष्ट्र,’ “मॅगनेटिक महाराष्ट्र’ आदी सर्व घोषणा फसव्या ठरल्या आहेत. दररोज लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. गेल्या चार वर्षांत राज्यात एकही उद्योग आला नाही. इंजिनिअरींगच्या सुमारे एक लाख जागा रिक्त आहेत. सरकारवर कर्जाचा बोजा वाढला आहे, म्हणून त्यांनी पेट्रोलवर जिझिया कर लावून पेट्रोलची भरमसाठ दरवाढ केली आहे. राफेल खरेदीत मोदी सरकारने सुमारे 40 हजार कोटींचा घोटाळा केला आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत.
आमदार थोरात म्हणाले, की देशात व राज्यात परिवर्तन अटळ असून आगामी काळात कॉंग्रेसचे सरकार येणार आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. दररोज कांदा, टॉमेटो, फळभाज्यांचे भाव कोसळत आहेत; मात्र पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. साखर, दुधाला भाव नाही. दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले असून एक रुपया ही अनुदान दिले नाही. मुख्यमंत्री सगळे मंजूर करतात; पण देत मात्र काहीच नाही. हे सरकार मोजक्‍या भांडवलदारांचे असून सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. सर्वांनी एकजुटीने राज्यात पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सरकार आणण्यासाठी कटिबद्ध व्हावे.
या वेळी नसीम खान, मधुकर भावे, दुर्गाताई तांबे, ओहोळ, डॉ. वाघमारे, डॉ. विखे, भाईजान आदींची भाषणे झाली. या वेळी निखील पापडेजा, केशवराव मुर्तडक, आनंद वर्पे, सुभाष सांगळे, अर्चना बालोडे, निर्मलाताई गुंजाळ, निशा कोकणे, बाजीराव पा. खेमनर, शिवाजीराव थोरात, ऍड.माधवराव कानवडे, शंकर पा. खेमनर, अमित पंडित, भाऊसाहेब कुटे, रामहरी कातोरे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नामदेव कहांडळ यांनी तर सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तडक यांनी आभार मानले.

युवकांची रॅली
अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेज गेटजवळ सुमारे पाच हजार युवकांची मोटारसायकल रॅली मोठया उत्साहात झाली. या वेळी रस्त्याच्या दुर्तफा स्वागत विविध फ्लेक्‍स व कमानी लक्ष वेधून घेत होत्या. महिला, नागरिक, युवक, शेतकरी, व्यापाऱ्यांनी या रॅलीचे मोठया जल्लोषात स्वागत केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)