भाजपकडून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष

वाघोली- मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारचे हवेली तालुका तसेच पुणे जिल्हा भाजप पक्षाच्या वतीने पेढे वाटून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या आरक्षणामुळे मराठा समाजाला भाजपकडून खरा न्याय मिळाला असल्याचे पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी सांगितले. यावेळी मांजरी येथील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोषात आरक्षणाचे स्वागत करून उपस्थितांना पेढे वाटप केले. यावेळी हवेली तालुक्‍याचे भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे, हवेली तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील उंद्रे, ग्रामपंचायतीचे सदस्य शरद आव्हाळे, ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)