बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मतदान यंत्रात फेरफार केल्याचा आरोप काँग्रेस नेते व उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केला आहे. भाजपने फेरफार केल्यानेच हक्काच्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष पराभूत झाला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून, मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिका वापराव्यात अशी मागणी त्यांनी केली.

पदभार हाती घेतल्यानंतर पहिल्याच परिषदेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अर्थात निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व २२४ मतदारसंघांत व्हीव्हीपॅट म्हणजेच मतदान चिठ्ठीचा प्रयोग केला होता. त्यामुळे मतदाराला नेमके मत कोणाला दिले याची खातरजमा करणे शक्य होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)