भाजपकडून करण्यात आलेलं उपोषण नौटंकी – अजित पवार

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या हल्लाबोल सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. भाजपकडून करण्यात आलेलं उपोषण हे  नौटंकी असून जनता सर्व जाणते अशी टीका यावेळी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केली.

तर मुख्यमंत्री ‘शुभंकरोती’ बोबड्या शब्दात बोलत होते तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते, आमच्या दैवतावर हल्ला केला तर आम्ही ‘आरे’ला आमच्या पद्धतीने ‘का रे’ असं उत्तर देऊ अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यानी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील यावेळी भाजपवर टीकेची झोड उठवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)