भाग्यश्री मोटे आता टॉलिवूडमध्ये

मराठी मालिकांच्या माध्यमांतून टीव्हीचा छोटा पडदा व्यापल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे टॉलिवूडमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 2019 या वर्षात भाग्यश्री तिच्या चाहत्यांना आनंदाचे आणि आश्‍चर्याचे अनेक धक्के देणार आहे. लवकरच ती ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या तेलुगू चित्रपटातून येत आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमाचा टीझरही सोशल मीडियात नुकताच प्रदर्शित झाला आहे.

दरम्यान, टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी, हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार याबाबत मात्र गुप्तता बाळगली गेली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात कधी खुला होणार याबाबत उत्सुकता आहे. मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास थांबतात. त्या ठिकाणी भूत असते आणि मग त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. भाग्यश्री मोटेने सोशल मीडियावर या चित्रपटाचा पोस्टर व टीझरही शेअर केले आहे. तसेच, माझ्या नवीन वर्षाची सुरुवात या बातमीने झाली. माझे तेलगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्याचा संदेश लिहायलाही ती विसरली नाही.

भाग्यश्रीने मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सध्या महाराष्ट्रात चांगलाच चर्चेत असलेल्या ‘पाटील’ या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

दरम्यान, भाग्यश्रीच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की, लवकरच ती म्हणे बॉलीवूडमध्येही झळकणार आहे.

याशिवाय “सिया के राम’मध्ये तिने नकारात्मक रोल केला होता. आता “गठबंधन’ या आणखी एका सिरीयलमध्ये ती नकारात्मक रोल साकारणार आहे. भाग्यश्रीने यापूर्वी “देवों के देव महादेव’मध्येही काम केले होते. मात्र आता ती या सिरीयलमध्ये असणार नाही, असे समजते आहे. तिच्याकडून याबाबत काही ठोस माहिती मिळाली नाही. चॅनेलकडूनही थेट उत्तर देणे टाळले गेले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)