भागीदारीच्या अमिषाने 46 लाखांचा गंडा

पिंपरी – व्यवसायात भागीदारीचे अमिष दाखवून गुंतवणुकीसाठी घेतलेले पैसे दुसऱ्याच व्यवसायात गुंतवणूक परस्पर नफा कमावत व्यापाऱ्याला गंडा घातल्याची घटना पिंपरीमध्ये नुकतीच उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जीवत प्रेमचंद नागराणी (रा. रेंटेड क्वॉर्टर, पिंपरी) याच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद मोटवाणी (वय 52, रा. पिंपरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवत नागराणी यांनी डिसेंबर 2015 मध्ये आर्थिक अडचणीचे कारण सांगत विनोद मोटवाणी यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी मिनरल वॉटर व सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय करु असे सांगत आणखी 25 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार जानेवारी व फेब्रुवारी 2016 मध्ये रोख आणि धनादेशाच्या स्वरुपात 19 लाख 50 हजार रुपये घेतले. ही रक्कम तसेच व्यवसायातील नफा दुसऱ्या व्यवसायात गुंतवला. नफ्याची रक्कम व व्यवसायासाठी गुंतवलेली रक्कम अशी एकूण 46 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू ठुबल तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)