भागीतवाडीत पोखरी केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा भागीतवाडी येथे पोखरी केंद्राची शिक्षण परिषद झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर बेंढारी होते, तसेच तळेघर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी रामदास पालेकर, उपसरपंच सचिन भागीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती उंडे, पोलीस पाटील दत्तात्रय बेंढारी, हभप पोखरकर महाराज, तसेच केंद्रप्रमुख रंजना उणवने यांच्या उपस्थितीत पार पडला.
या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून उपसरपंच सचिन भागीत यांनी सर्वांचे स्वागत करून, शिक्षण विषयावर मौलिक विचार मांडले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणावा आणि त्या दृष्टीने पोखरी केंद्रातील सर्व शिक्षक प्रयत्नपूर्वक काम करतात, याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. केंद्रप्रमुख रंजना उणवणे यांनी सर्व शिक्षकांना परिषदेत करावयाच्या गटकार्याविषयी आणि एकंदरीत गटसंमेलनाविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. परिषदेच्या शेवटी रामदास पालेकर सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना सर्वांना सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करण्यास व विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याविषयी मार्गदर्शन केले. आभार लहु घोडेकर यांनी मानले. शिक्षण परिषदेचे आयोजन भागीतवाडी शाळेत या शाळेचे मुख्याध्यापक मंगेश बुरुड आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका सविंद्रा कोळप यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)