श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ

पुणे – पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणी केली, लोकमान्य टिळक की, भाऊ रंगारी? या मुद्यावरून यावर्षीही पुन्हा नव्याने वाद उभा राहण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर “पुण्यात सर्वप्रथम भाऊ रंगारीकडून गणेशोत्सवाची सुरुवात’ अशी माहिती प्रसिध्द केली आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा होण्याची शक्‍यता आहे. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा पुण्याचा “अभिमान’ असून, लाखोंच्या संख्येने हा उत्सव पाहण्यासाठी भाविक येत असतात.

दरम्यान, मागील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवात पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात कोणी केली यावरून वाद उफाळला होता. त्यावेळी भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असे सांगत, भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. दरम्यान, हा विषय न्यायप्रविष्ट असून, त्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे. परंतु, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर भाऊ रंगारी यांनी सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)