भाऊ, तुमच्या या संघर्षात तालुक्‍याला खेचू नका

जावळीकरांची आर्त प्रतिक्रया

प्रसाद शेटे
मेढा – श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले या चुलत बंधुंमधील संघर्ष सर्वश्रुत आहेच. या संघर्षाला पूर्णविराम द्यायचा वरिष्ठ नेतेमंडळीकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही राजेही आता मनोमिलनाच्या वाटेवर दिसत आहेत. तथापि, शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना याचा विसर पडलेला दिसतोय.
निवडणुका तोंडावर असताना मानकुमरे यांचे जावळीत उदयनराजेंच काही चालत नाही, असे विधान करणे हे दोन्ही राजेंमधील संघर्ष पेटवण्यासारखे तर आहेच, शिवाय जावळी तालुक्‍याला या संघर्षात खेचण्यासारखे आहे. त्यामुळ भाऊ, तुम्ही जावळीतील विकासकामांकडे लक्ष द्या, जावळी तालुक्‍याला विनाकारण संघर्षात खेचू नका, अशी आर्त प्रतिक्रिया जावळीकराकडून उमटत आहेत.

पंचायत समिती सभापती वसंतराव मानकुमरे यांनी जावळी तालुक्‍यात फक्त शिवेंद्रराजेंचे चालतं, उदयनराजेंच नाही, असे खळबळजनक विधान केल होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजेंच्या संघर्षाच वादळ घोंगावण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मानकुमरे हे खळबळजनक विधानामुळे चर्चेत असतात. या अगोदरही मानकुमरे आणि उदयनराजे यांच्या संघर्षाची झळ जावळी तालुक्‍याला बसली होती. जि. प. निवडणुकीवेळी उदयनराजेंच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे जावळी तालुक्‍यासह सातारा शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यंतरी शिवेंद्रराजेंच्या वाढदिनी एक दगड मारला आणि जि.प.उपाध्यक्ष झालो आता आणखी दगड मारतो आणि खासदार होतो, असे बेताल वक्तव्य भर सभेत केल होते. परंतु, अशा वादग्रस्त विधानामुळे जावळी तालुक्‍याला संघर्षाच्या दरीत खेचायच प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातून राजकीय पोळी भाजण्याचा डाव स्पष्ट दिसत आहे. दुर्गम जावळी शांत असली तरी मानकुमरे यांची विधानं या भागाला संघर्षाकडे नेणारी आहेत. राजकारणातील संघर्ष विधायक पद्धतीने पुढे गेल्यास निकोप स्पर्धेतून विकासाची वाट तयार होते. विध्वंसक जोपासना झाली तर अधोगतीपासून कोणीही रोखू शकत नाही. दोन्ही राजांवर जावळीतील लोकांचे भरभरून प्रेम आहे. त्यामुळे यांचे चालतं, त्यांचं चालत नाही, अशा विधानांपेक्षा तालुक्‍यात अनेक प्रश्‍न गंभीर होत चालले आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

तरुणपिढी रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर

तालुक्‍यातील तरुण पिढी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जात आहे, रस्ते, स्वच्छता अशा नागरी सुविधांची स्थितीही लक्ष देण्यासारखी आहे. सर्वसामान्याच्या जगण्यात अडथळे ठरणारे अनेक प्रश्‍न अवतीभोवती असताना लोकांचा थेट संबंध नाही, अशा प्रश्‍नांसाठी संघर्ष करण्यात नेतेमंडळीनी ताकद वाया घालवू नये. अशीच अपेक्षा असेल तर ती चुकीची नाही. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचे जगणे सुंदर होण्यासाठी या दोन्ही राजांनी नियोजन पूर्वक पुढाकार घेतला आहेच. पण अशी विधान करणाऱ्यांवर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)