भाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी कलाकार भाऊ कदम आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकतात. या दिवाळीमध्ये भाऊ कदम यांनी मुंबईकरांना परिसर स्वच्छ राखण्याचा संदेशदेखील दिला होता. लवकरच नवीन वर्षात कदम यांच्या ‘नशीबवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटतील. या चित्रपटात कदम हातात झाडू घेऊन एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स च्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

-Ads-

‘दिल्ली की दीवार’ उदय प्रकाश लिखित कथेवर आधारीत असलेला ‘नशीबवान’ हा सिनेमा 11 जानेवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच हा स्वच्छता कामगाराच्या जीवनाच्या अनुभव सांगणारा आहे. चित्रपटात मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांची देखील मुख्य भूमिका आहे. ‘नशीबवान’ या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)