भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सभा

मंचर – पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष ऍड. सुनिल बांगर, रोटरी क्‍लब मंचरचे माजी अध्यक्ष शरद पोखरकर, उद्योजक गोविंद खिलारी, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, अनसू मनाजी पोखरकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्योजक भरत बांगर यांनी सांगितले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण हेच श्रेष्ठ असल्याची जाणीव समाजाला करून दिली. त्यामुळे सर्वच समाज शिक्षणाला महत्त्व देऊ लागला. त्याचा फायदा सर्वांना झाला आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रभाकर बांगर, जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक भीमराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. व्ही. एम. खुडे व एन. एस. सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. ए. पी. वाडेकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)