‘भाई झाला का’ विचारणा करत हल्ला

पुणे- पूर्व झालेल्या वादातून आणि भाई झालास का अशी विचारणा करत तरुणावर पालघनने वार करण्यात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोयल पठाण (22, रा. येरवडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमित रवीकिरण गायकवाड व सोल्या उर्फ विवेक कांबळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्याचा मित्र मंगेश दामले याच्यासोबत दुचाकीवरून घरी जात होता. यावेळी दोघाही आरोपींनी त्याला पूर्व झालेल्या वादातून थांबवले. यानंतर “ज्यादा भाई बन रहा क्‍या’ असे म्हणून दुचाकीवरून त्याला खाली ओढले. यानंतर पालघनने त्याच्या दोन्ही हातावर, पोटऱ्यांवर, डोक्‍यात वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लोहार तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)