“भाईं’चे जंगी स्वागत पडले महागात

पिंपरी – “भाई’ जामिनावर सुटल्याचे सोशल मीडियावर “व्हायरल’ करण्यात आले. एवढेच नव्हे तर “भाईं’चे परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. त्याचेही व्हिडीओ “व्हायरल’ झाले. पोलिसांपर्यंत हे व्हिडीओ पोहचले आणि पोलिसांनी आणखी दोन गुन्ह्यात असलेल्या “भाईं’ना पुन्हा आत टाकण्यात आले. हा सारा प्रकार चिंचवड येथे घडला.

रणजीत उर्फ रंज्या बापू चव्हाण (वय-23, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड ) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर चिंचवड, निगडी, वाकड, वडगाव मावळ या ठिकाणी एकूण 16 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चव्हाण याने साथीदारांच्या मदतीने आकाश उर्फ रायबा तानाजी लांडगे (वय-24, रा. पागेची तालीम, चिंचवड) या तरुणाची 29 मे 2018 रोजी निर्घृण हत्या केली होती. आकाशच्या खुनानंतर चव्हाण तीन महिने पोलिसांना फरार होता. चिंचवड पोलिसांनी त्याला भूम येथे सापळा रचून अटक केले होते. त्यानंतर त्याची सोमवारी (दि. 21) जामिनावर सुटका झाली. सुटका होताच चव्हाणने वेताळनगर परिसरात शंभर ते दीडशे साथीदारांसह स्वतःची मिरवणूक काढली.

त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात “व्हायरल’ केले. “किंग ईज बॅक’ अशा “टॅग लाईन’ने ते फिरत होते. मात्र या व्हिडीओची पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने त्याला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच तो वाकड पोलीस ठाण्यात सन 2017 मध्ये दाखल असलेल्या जबरी चोरी आणि दंगलीच्या गुन्ह्यात फरार असल्याने त्यास वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वाकड पोलिसांनी चव्हाणला बुधवारी (दि. 30) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)