भांडवलीत श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

भांडवली ः श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव. (छाया ः संदीप जठार)

गोंदवले, दि. 9 (प्रतिनिधी)- राष्ट्राला ज्या ज्या वेळी गरज भासेल त्या त्या वेळी मदतीसाठी तयार राहणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कला व वाणिज्य विद्यालय वडूजचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले.
दहिवडी कॉलेज विशेष श्रम संस्कार शिबिर भांडवली (ता. माण) येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्‌घाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव, सरपंच बालिका सूर्यवंशी, उपसरपंच सुनिल सुर्यवंशी, वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन युवराज सूर्यवंशी, उपप्राचार्य बी. एस. बलवंत, प्रा. डॉ. ए. एन. दडस, डॉ. वैभव तिवाटणे, अतुल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना तरुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी सुरु झाली. जगातील 162 देशांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना सुरु आहे. हे शिबिर म्हणजे कामाची ओळख करुन देण्याचा एक प्रयत्न असतो. आपल्या कुवतीची ओळख करुन घेण्याची, व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्याची ही एक चांगली संधी असते.
सुनिल सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. के. एस. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एन. बी. लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले तर जी. बी. लोहार यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)