भांडणे सोडवणाऱ्यास दगडाने मारहाण

पिंपरी – भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या मध्यस्थी व्यक्तीलाच दगडाने मारहाण केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली आहे.

याप्रकरणी अश्‍विनी संतोष काळे (वय-27, रा. भोसरी) यांनी फिर्याद दिली असून प्रज्वल बाबुराव कांबळे, महेश लक्ष्मण चौरे या दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संतोष काळे हे जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यांच्या घरासमोर त्यांचा मावस भाऊ अकाश गव्हाणे व आरोपी यांची भांढणे सुरु होती. यावेळी संतोष यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता संतोष यांना आरोपींनी दगडाने मारहाण केली.यामध्ये संतोश हे जखमी झाले. याचा एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)