भांडणात पत्नीचे दात पाडले

पिंपरी – पती पत्नीच्या झालेल्या किरकोळ भांडणात पतीने पत्नीचे तीन दात पाडल्याची घटना चिखली येथे घडली आहे.

विजय भीमराव बनकर (वय-45, रा. चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2005 मध्ये फिर्यादी महिला आणि बनकर यांचा विवाह झाला आहे. तेव्हापासून त्यांच्यात किरकोळ कारणाहून वाद सुरू आहेत. दि. 31 जुलै रोजी सकाळी फिर्यादी महिला या मुलांच्या डब्ब्यासाठी भाजी बनविताना बनकर आणि त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणाहून वाद झाला. या वेळी बनकर याने पत्नीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यामध्ये त्यात त्यांचे समोरील तीन दात पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)