भांडणाचा जाब विचारल्याने मारहाण

पिंपरी – दुकानात भांडणे केल्याने जाब विचारण्यास गेलेल्या दोघांना हाताने तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना चिंचवड येथील इंदिरानगर परिसरात घडली.

या प्रकरणी शुभम विजय रावळकर (वय-22, रा. इंदिरानगर, चिंचवड ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विशाल पवार (वय-25), संतोष धोत्रे (वय-20), सागर मांजाळकर (वय-19, तिघे रा. इंदिरानगर, चिंचवड) आणि दत्ता (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावळकर यांचे चिंचवड येथील मोहनगर परिसरात “राजपूत कलेक्‍शन’ नावाने कपड्याचे दुकान आहे. या दुकानात आरोपी विशाल पवार आणि राकेश चौधरी यांची भांडणे झाली असताना रावळकर यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली. तसेच, माझ्या दुकानात भांडणे करू नका असे सांगून त्यांना दुकानाबाहेर जाण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी रावळकर यांना देखील धक्काबुक्की करीत बघून घेतो अशी धमकी दिली.

त्यानंतर रावळकर यांनी झालेला प्रकार त्यांचे मामा चंद्रविलास जाफरसिंग राजपूत यांना सांगितला. त्यावर रावळकर यांचे मामा आणि त्यांचा मुलगा अविनाश राजपूत हे तिघेजण विशाल पवार यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. आरोपी पवार याने त्यांचे काही ऐकून न घेता साथीदारांना बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. पवार याने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून रावळकर यांच्या डोक्‍यात मारून जखमी केले. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पांढरे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)