भांडगावमधील मसाले कंपनीच्या गोडाऊनला आग

यवत- दौंड तालुक्‍यातील भांडगाव गावच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या प्रवीण मसालेवाले कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.12) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. यात जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रात्री अचानक या कंपनीच्या गोडाऊनला आग लागल्याचे निदर्शनास आले. ही लागलेली आग विझविण्यासाठी भीमा सहकारी साखर कारखान्याचा आणि कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या बंबला पाचारण करण्यात आले होते. लागलेली ही आग अडीच ते तीन तासात आटोक्‍यात आली. गुरुवारी कंपनीला सुट्टी असल्याने या परिसरात कामगार नव्हते. या गोडाऊनमध्ये मसाल्याच्या पदार्थांचा साठा होता. या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली याचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)