भव्यदिव्य शौर्यगाथा ‘पद्मावत’

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘पद्मावत’ अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा ही ऐतिहासिक किंवा वास्तव नसून ती प्रसिद्ध कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या काव्य रचेनवर आधारित असल्याचे चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगण्यात आले आहे.

‘पद्मावत’ची कथा सांगायची तर सिंधल राज्याची राजकुमारी पद्मावती (दीपिका पदुकोण) हि अत्यंत सुंदर आहे. सौदार्याबारोबरच ती शस्त्रास्त्र पारंगत असून तिला राजनीतीचे ज्ञान आहे. एकेदिवशी मेवाडचे महाराज रतन सिंह (शाहिद कपूर) यांची भेट अचानक पद्मावतीसोबत होते आणि ते तिच्या प्रेमात पडतात. पद्मावतीचे लग्न विवाहित असलेल्या रतन सिंह यांच्याशी होते. सर्वकाही सुरळीत सुरु असते. पण रतन सिंह यांच्या दरबारातून हकालपट्टी झालेला राजपुरोहित राघव चेतनची भेट दिल्लीच्या सुल्तान अलाउद्दीन खिलजी (रणवीर सिंग) याच्या सोबत होते. हाक राजपुरोहित अलाउद्दीन खिलजीला राणी पद्मावतीच्या सौंदर्याचे वर्णन करतो आणि सांगतो की पद्मावती तुला मिळाली तर तू दुसरा सिकंदर होशील, त्यानंतर अल्लाऊदीन पद्मावतीला मिळवण्यासाठी मेवाडवर हल्ला चढवतो. खिलजी कपटीपणाने महारावल रतन सिंहला बंदी बनवतो आणि त्यांच्याकडे राणी पद्मावतीची मागणी करतो. पुढे काय होणार याची उत्सुकता तुमच्या मनात निर्माण झाली असेल आणि पद्मावतीने जोहार का केला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली असेल त्यासाठी ‘पद्मावत’ मोठ्या पडद्यावर पहायला हवा..

-Ads-

‘पद्मावत’मध्ये बहुतांश दृश्यांमधून राजपूत रणनितीचे, त्यांच्या शौर्याचे उत्तम दर्शन घडते. सिनेमात राजपूत आणि खिलजींमधल्या युद्धातलं प्रत्येक दृश्य उत्कंठा वाढवणारे आहे. ज्या मुद्दयांवर करणी सेनेचा या ‘पद्मावत’ला विरोध होता, असा एकही मुद्दा किंवा एकही दृश्य सिनेमात नाही. राणी पद्मावतीच्या ऐतिहासिक प्रतिमेच्या चौकटीला कुठेही धक्का लावलेला नाही. खरं तर संपूर्ण सिनेमा हा राजपूत की आन, बान आणि शान असाच आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाची भव्यता यात आहेच याशिवाय त्याने पटकथेवर घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसते.. त्यांनी राणी पद्मावतीचे सौंदर्य अतिशय उत्कृष्टपणे पडद्यावर चित्रीत केले आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये भन्साळींची जादू बघायला मिळते.

‘पद्मावत’ मधील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर सिंग, पद्मावती साकारणारी दीपिका पदुकोण आणि रतनसिंह यांची भूमिका करणारा शाहीद कपूर या तिघांनीही आपल्या भूमिकेला साजेसा अभिनय केला आहे. पण यातलं मोठं सरप्राइज पॅकेज आहे ते रणवीर सिंगचं. त्याने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला अल्लाउद्दीन खिल्जी अफलातून रंगवला आहे. त्याच्या ताकदीला टक्कर दिली ती दीपिकाच्या सौंदर्याने आणि संवादांनी. तुलनेने शाहीद कपूरची यातली भूमिका किंचित दुय्यम आहे. पण त्याने धोरणी, तत्वनिष्ठ राजा चांगला रंगवला आहे. याशिवाय आदिती राव हैदरी, रझा मुराद यांनीही आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
चित्रपटातील घुमर आणि एक दिल एक जान ही गाणी चान झाली आहेत. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि अप्रतिम भव्यता यामुळे हा चित्रपट डोळ्यांचे पारणे फेडतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजपुतांच्या शौर्याचे महत्व अधोरेखित करणारा हा ‘पद्मावत’ बघायला काहीच हरकत नाही.

चित्रपट – पद्मावत
निर्मिती – संजय लीला भन्साळी, सुधांशु वत्स, अजीत अंधारे
दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी
संगीत – संजय लीला भन्साळी, संचित बल्हरा
कलाकार – रणबीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहीद कपूर
रेटिंग – ****
– भूपाल पंडित
pbhupal358@gmail.com

What is your reaction?
25 :thumbsup:
18 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
3 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)