भविष्य निर्वाहनिधीची रक्कम ईटीएफ मध्ये गुंतवण्याची शिफारस 

नवी दिल्ली: इपीएफओ ने नेमलेल्या तज्ज्ञांच्या एका समितीने भविष्य निर्वाह निधीची काही रक्कम पाच ते दहा वर्षाच्या अवधीसाठी शेअरबाजारात गुंतवण्याची शिफारस निधी व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यामुळे चांगला परतावा मिळेल आणि निधीच्या सहा कोटी सदस्यांना त्याचा चांगला लाभ देता येईल असेही या समितीने म्हटले आहे.
एम्लॉईज प्रॉव्हीडंट फंड ऑर्गनायझेशच्या 19 सप्टेंबर रोजी झालेल्या सल्लागार मंडळाच्या बैठकीत समितीने हा अहवाल सादर केला. तथापी या बैठकीत त्यावर चर्चा होऊ शकली नाही. मंडळाच्या पुढील बैठकीत आता त्यावर चर्चा होणार आहे. हा निधी तीन वर्षांच्या अवधीसाठी न गुंतवता तो एक्‍सचेंज ट्रेडेड फंड मध्ये किमान दहा वर्षांच्या मुदतीसाठी गुंतवावा अशी तज्ज्ञांच्या समितीची शिफारस आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)