भविष्यात भारत-पाकचा संयुक्त सैन्याभ्यास ?

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली भारत-पाकिस्तान आगामी काही महिन्यांमध्ये संयुक्त सैन्याभ्यास करू शकतात. रशियात ऑगस्टमध्ये होऊ घातलेल्या संयुक्त सैन्याभ्यासात दोन्ही देश एकाचवेळी भाग घेऊ शकतात. शांघाय सहकार्य संघटनेत (एससीओ) पूर्णवेळ सदस्य झाल्यावर भारत आणि पाकिस्तान अन्य सदस्य देशांसोबत दहशतवादविरोधी समन्वयांतर्गत संयुक्त सैन्याभ्यास करू शकतात.

या अगोदर देखील संयुक्त राष्ट्राच्या झेंडय़ाखाली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याधिकाऱयांनी आपली सेवा बजावली होती. परंतु शांघाय सहकार्य संघटनेचे अन्य देश चीन, कजाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उज्बेकिस्तानसोबत भारत आणि पाकचे सैन्य संयुक्त सैन्याभ्यासात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. एससीओचा पूर्णवेळ सदस्य झाल्यावर दोन्ही देश ताश्कंदच्या रिजनल अँटी टेररिझम स्ट्रक्चरचा भाग ठरले आहेत.

-Ads-

भारत आणि पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाईत परस्परांना कशाप्रकारे सहकार्य करणार हा खरा प्रश्न आहे. दोन्ही देशांदरम्यान अविश्वासाची मोठी दरी असून दोघेही अनेक मुद्यांवर परस्परांच्या विरोधात आहेत.  एससीओ अंतर्गत मर्यादित दहशतवादविरोधी सहकार्य शक्य आहे. परंतु दोन्ही देश द्विपक्षीय संयुक्त सैन्याभ्यासाच्या जागी बहुपक्षीय संयुक्त सैन्याभ्यासाची निवड करू शकतात.

बिसेक संमेलनाप्रमाणे पीस मिशन-2007 नावाअगोदर पहिला एससीओ सैन्याभ्यास आयोजित करण्यात आला होता. दहशतवादविरोधी मोहिमेला केंद्रीत करून 9 दिवसांपर्यंत चाललेल्या या सैन्याभ्यासात सर्व एससीओ देशांच्या सैन्याने यात भाग घेतला होता. या सैन्याभ्यासात 6500 सैनिक सामील होते. ज्यात सर्वाधिक रशियाचे 2 हजार, चीनचे 1700 सैनिक आणि कजाकिस्तान तसेच ताजिकिस्तानच्या सैन्याची छोटी तुकडी, किर्गिस्तानचे विशेष पोलीस पथक, उज्बेकिस्तानचे 20 सैन्याधिकारी सामील होते. चीन आणि रशियाच्या सुमारे 500 युद्धवाहने, 80 लढाऊ विमानांनी भाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)