भविकांच्या सुरक्षेसाठी 150 जीवरक्षकांची फौज

तीन ठिकाणी बिनतारी संदेश मदत केंद्र

पुणे – गणेशोत्सवात शहरातील प्रमुख 18 विसर्जन घाटांवर महापालिकेच्या अग्निशमन दलाने 18 जवान असेच सुमारे 130 खासगी जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. या जीव रक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून लाइफ जॅकेट, लाइफ-बॉय व रात्रीच्या वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेन्ट जॅकेट उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरात दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहाव्या दिवशी भाविकांकडून गणेशमूर्ती विसर्जन केले जाते. या 10 दिवसांत महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षही 24 तास सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, प्रत्येक घाटावर नदी किनारी नागरिक व त्यांचे समवेत येणाऱ्या लहान मुलांनी गर्दी करू नये, म्हणून नदी किनारी आडवा दोरखंड लावण्यात आला आहे. काही घाटांवर नदीपात्रात आडवादोर बांधण्यात आला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास, या दोरखंडास धरून आपला जीव वाचवू शकतात. नटराज घाटावर लाइट मास्ट बसविण्यात येणार आहे.

हे आहेत प्रमुख 18 घाट
अमृतेश्वर घाट, पुलाची वाडी, नटराज सिनेमा जवळ, ओंकारेश्‍वर, वद्धेश्‍वर, गरवारे कॉलेज, कॉजवे, पांचाळेश्‍वर घाट, अष्टभूजा मंदिर, संगम घाट, बंडगार्डन, विठ्ठल मंदिर मागे, खंडोजीबाबा चौक, बापू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान, येरवडा, दत्तवाडी घाट, वारजे स्मशानभूमी घाट, सिद्धेश्‍वर मंदिर, राजाराम पूल

मिरवणुकीसाठीही दल सज्ज
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशविसर्जनाची भव्य मिरवणूक निघते. यात काही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने आवश्‍यक ती मदत पाठविणे अथवा मिरवणुकीसंबंधीची माहिती मिळविण्यासाठी मिरवणूकीच्या मार्गावर तीन ठिकाणी अग्निशमन दलाची बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यात टिळक चौक, लक्ष्मी रस्त्यावरील कॉंमनवेल्थ इमारत तसेच नटराज सिनेमागृहाजवळ ही यंत्रणा असणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रमुख क्रमांक
100 – पोलीस यंत्रणा
1015 – अग्निशमन यंत्रणा
108 – अॅम्ब्युलन्स
आपत्ती व्यवस्थापन कक्ष : 020-25506800, 1/2/3/4
पीएमसी केअर टोल फ्री क्रमांक : 1800-1030-222


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)