भवानीनर परिसरात बरसल्या श्रावण धारा

बळीराजा सुखावला : दमदार पावसाची प्रतीक्षा

भवानीनगर: पाऊसाळा सुरु होऊन दोन महिन्यानंतर काटेवाडी, भवानीनगर परिसरात गुरुवार (दि. 16) पासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी व नागरिक समाधानी झाले आहेत.

-Ads-

पावसाळा सुरू होऊन तब्बल तीन महिने होऊन गेले तरीही भवानीनगर, काटेवाडी परिसरात केवळ एक ते दोन पाऊस झाले मात्र, तेही न झाल्यासारखेच झाले. त्यामुळे शेतकरी पाण्याविना हवालदिल झाले होते. शेतातील उभ्या पिकांना कसे पाणी मिळणार? जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. तर शेतातील विहिरींचे ही पाणी कमी झाल्याने सगळेंच चिंतेत होते. दरम्यान, श्रावण महिना सुरू झाला आणि पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, दमदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे अद्यापही आकाशाकडे लागले आहे.

दरम्यान, गुरुवारी रिमझिम का होईना पावसाने सुरुवात केल्याने शेतपिकांना नवसंजीवनी मिळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणे भरल्याने त्यातून विसर्ग सुरू असल्याने नीरा डाव्या कालव्याला पाणी जरी आले तरी ते काही भागापुरतेच मिळत आहे. मात्र, जादा अंतरावरील शेतकरी व माळरानावरील शेतकरी या पाण्यापासून कायम वंचित असतात. या शेतकऱ्यांना फक्त पाऊसाचा आधार आहे. पाऊस नाही पडला तर याभागातील शेतकरी आणखी कर्जाच्या खाईत लोटला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)