भवानीनगरात टेलरचे दुकान खाक

भवानीनगर, दि. 21 (वार्ताहर) – येथील व्यापारपेठ पत्राशेड मधील टेलरच्या दुकानाला शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत शिलाई मशीन व ड्रेस जळून खाक झाल्याने 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. भवानीनगर (ता.इंदापूर ) येथील श्री छत्रपती साखर कारखाना येथे व्यापार पेठ मधील पत्राशेडमध्ये भाग्यनगर येथील राहणारे दिलीप ढगे यांचे टेलरिंगचे दुकान आहे. ढगे हे रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले असता मंगळवारी (दि. 20) मध्यरात्री तीनच्या सुमारस त्यांच्या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. दुकानातून धूर बाहेर येत असलेला ऊस तोडणी मजुराने पाहिले व त्याने रात्री गस्तीवर असणारे कारखान्याचे सिक्‍युरिटीस सांगितले. घटनेचे गांभिर्य ओळखून तातडीने घटनेच्या ठिकाणी सिक्‍युरिटी ऑफीसर दत्तात्रय पिसे आले असता तातडीने कारखान्याची अग्निशमन गाडी बोलावून घेऊन पाणी मारल्याने ही आग विझवण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)