भर हिवाळ्यात पावसाचा अंदाज

पुण्यात राज्यातील नीचांकी तापमानाची झाली नोंद

पुणे – उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे नाशिक, नगर, पुणे येथे गारठा वाढला आहे. गुरुवारी (दि.1) पुण्यात राज्यातील नीचांकी 14.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, पावसाला पोषक हवामान होत असल्याने येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड हवेचे प्रवाह वाढले असून, दुपारच्या वेळीही गार वारे वाहत असल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. नाशिकसह नगर, पुण्यात तापमान 14 अंशांच्या आसपास आल्याने थंडी वाढली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद सुद्धा आज पुण्यात झाली आहे. पुण्यात दिवसाच्या कमाल तापमानात सुद्धा घट होऊन ते 31.9 अंश सेल्सियस पर्यत खाली घसरला आहे. त्यामुळे शहरात गेले दोन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे.

दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 ते4.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्याच्या दक्षिण भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (दि.3) आणि रविवारी (दि.4) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)