भर वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोची पायलिंग मशीन कोसळली

– सुदैवाने जिवीतहानी टळली

पिंपरी – नाशिकफाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळ वर्दळीच्या रस्त्यावर मेट्रोच्या पाया खोदण्यासाठी वापरण्यात येणारे पायलिंग मशीन आज (शनिवारी) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कोसळले. सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. पुण्याकडून पिंपरीकडे येणाऱ्या मार्गावर काही टन वजनाची अवाढव्य मशीन कोसळल्यामुळे तेथील सर्व वाहतूक ठप्प झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्याकडून चौकाच्या दिशेने येणाऱ्या पुलाच्या उताराजवळ ही घटना घडली. पूल व सेवा रस्ता यांच्यामधील भागात मेट्रोने दोन्ही बाजूला लोखंडी बॅरीकेट लावून मशीनद्वारे पाया खोदण्याचे काम सुरू केले आहे. पायलिंगचे काम संपल्यानंतर मशीन पाठीमागे घेत असताना, ते कोसळले, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मशीन हळूहळू जमिनीच्या दिशेने आल्यामुळे पुलावरून येणाऱ्या वाहनचालकाला त्याची गाडी थांबविता आली, तर सिग्नल सुरू राहिल्यामुळे तेथील बसगाडी व अन्य वाहने पुढील बाजूला निघाली होती. त्यामुळे मशीनच्या खाली कोणतेही वाहन सापडले नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कामाच्या दृष्टीने आव्हानात्मक असलेल्या नाशिकफाटा परिसरात 31 खांब उभारण्यात येणार असून, त्या कामासाठी पाया खोदताना ही घटना घडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)