भर पावसाळ्यात पळसदेव तलाव कोरडाच

पळसदेव- भर पावसाळ्यात पळसदेवचा तलाव कोरडाच असल्याने वन्य प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी मागील आठवड्यात पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडताना हरणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आणखी किती वन्य प्राण्याचा जीव गेल्यावर तळ्यात पाणी सोडणार, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील काळे यांनी व्यक्त केला आहे.
पळसदेव तलावावर जवळपास 400 ते 500 एकर क्षेत्र ओलिताखाली येते. शिवाय या परिसरात हरीण, ससे, कोल्हे, काळवीट यासारखे वन्यप्राणी वास्तव्य करतात. अनेकदा पाण्यासाठी महामार्ग ओलांडताना या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. उजनी धरण भरले असताना देखील केवळ पाटबंधारे विभागाच्या भोंगळ धोरणामुळे इंदापूर तालुक्‍यातील तलाव कोरडेच राहिले आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाटबंधारे विभागात गुरे सोडून पाटबंधारे विभागाची कार्यालये बंद करणार असल्याचे बळीराजा संघटनेचे संघटक अनिल खोत यांनी सांगितले. इंदापूर तालुक्‍यात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे कायदा नियम दाखवू नका आणि वन्य प्राण्यांना मारू नका, या भागात यापुढे एकजरी प्राण्याचा मृत्यू झाला तर त्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहिल, आसेही खोत यांनी सांगितले. यावेळी पाटबंधारे विभागाने मागील आठवड्यात इंदापूर तालुक्‍यातील तलावात पाणी सोडता येणार नाही, अशी भूमिका मांडली होती, त्यामुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. तरी तातडीने पळसदेव तलावासह इंदापूर तालुक्‍यातील सर्वच तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)