भर दिवसा सोनसाखळी हिसकावली

पिंपरी- इंद्रायणीनगर, भोसरी येथे भर दिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

महिला पायी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून नेली. महिलेने या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक कठोरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)