भरपावसातही बालगोपाळ रमले मैदानी खेळात

कवठे ः पावसामध्ये कब्बडी या खेळाचा आनंद घेताना शाळकरी मुले. (छाया : करुणा पोळ)

कवठे, दि. 26 (वार्ताहर) – इंटरनेट युगामुळे तरुणांसह लहान-लहान मुलेही मोबाईलच्या जाळ्यात अडकली आहे. सध्या पावसामुळे घराबाहेर न पडता दिवस दिवस मोबाईलमध्ये डोकं घालुन बसणे असाच दिनचर्य तरुणांसह अबालवृद्धांचाही सुरु असताना कवठेतील बालगोपाळांनी मात्र मोबाईलला घराच्या कोपऱ्यात फेकुन देत भर पावसात कबड्डीसह इतरही मर्दानी खेळ खेळत येथील ग्रामस्थांना जुन्या आठवणींचीच आठवण करुन दिली.
जिल्ह्यासह राज्यभरात चार-पाच दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. शनिवार आणि रविवारी असणाऱ्या सुट्टीच्या दिवशी अनेकांना सुरुवातीला पावसामुळे नाकतोंड मुरडले. पावसामुळे नोकरदारांनाही घराबाहेर पडणे अशक्‍य झाले. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागात अनेकांनी घरात बसूनच टीव्ही पाहणे किंवा मोबाईल वर व्हॉटस्‌ऍप, फेसबुकमध्येच मन रमविले. परंतु, या साऱ्यापासून दूर असलेल्या कवठे येथील बालगोपाळांनी पावसात भिजत मनमुराद आनंद लुटला. विशेष म्हणजे गावात असणाऱ्या विद्यालयाच्या मैदानात एकत्र जमून या बालगोपाळांनी कबड्डी, खो-खो असे मैदानी खेळ खेळत आपली सुट्टी आनंदात घालविली.
सध्याच्या लहान-लहान मुलेही मोबाईलमध्येच गुंग राहत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. शहरांसह ग्रामीण भागातही याचे पेव फुटले आहे. त्यामुळे तरुणांसह बालगोपाळांनाही मैदानी खेळांचा विसर पडला असून सध्याची मुले ही शारिरीकदृष्ट्या कमकुवत असल्याचेच दिसते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)