भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे खराडी बायपास रस्त्यावर घडली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुब्राता चक्रवर्ती (58, रा. हांडेवाडी, हडपसर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. चक्रवर्ती हे पहाटे एस.पी.एम. महाविद्यालयाजवळून पायी चालले होते. यावेळी एका वाहनाने दिलेल्या धडकेने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह पळून गेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक खेडकर तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)