भरधाव मोटारीची पोलिसाला धडक

पिंपरी – भरधाव वेगात आलेल्या मोटारीने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास देहू फाटा चौक आळंदी येथे घडली.

पोलीस शिपाई रवींद्र सरमहाले (रा. तापकीर नगर, पंचम सृष्टी अपार्टमेंट, आळंदी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 18, ईसी 1147 या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रवींद्र सरमहाले देहू फाटा चौक आळंदी येथे कर्तव्यावर होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास वरील कार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात आली. त्यामुळे फिर्यादींनी कार चालकाला कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने भरधाव वेगात फिर्यादी यांना धडक दिली. यामध्ये सरमहाले जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)