भरधाव डंपरची टेम्पोसह दोन दुचाकीला धडक

सहा ते सात जण जखमी : धायरी गावातील मुक्ताई गार्डनजवळील घटना

पुणे – भरधाव डंपरने टेम्पोसह दोन दुचाकीला धडक दिली. मंगळवारी (दि.6) रात्री धायरी गावातील मुक्ताई गार्डनजवळ घडलेल्या या अपघातात सहा ते सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये दुचाकीवरील चालकांसह पादचारी नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

डंपर घेऊन धायरी गावातून पुढे जात असताना मुक्ताई गार्डनजवळ चालकाचा डंपरवरील ताबा सुटला आणि समोरील टेम्पोला धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की, त्यामध्ये दोन दुचाकी आणि पादचारी नागरिकांना वाहनाची धडक बसली. अपघात घडताच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. डंपरचा वेग वाढत असल्यामुळे नागरिक आजूबाजूला पळत होते. अखेर डंपर थांबल्यावर अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी करत जखमींना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अपघाताबाबत सिंहगडरोड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी पाठवून दिल्यावर अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यात आली. या अपघातात टेम्पो आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी गावात भरधाव डंपरने समोरील दुचाक्‍या तसेच एका टेम्पोस धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार तसेच टेम्पोतील नागरिक जखमी झाले आहेत. त्यातील एका व्यक्तीवर नवले हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. इतर जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)