भरधाव ट्रकने सहा जणांना ठार केले 

बस्ती: उत्तरप्रदेशात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने सहा जणांना चिरडून ठार केल्याची घटना आज घडली असून या ट्रकच्या धडकेने अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
उत्तरप्रदेशातील भदोही गावाजवळ ही घटना घडली. तेथे अलाहाबादहून गोरखपुरला जाणारी राज्य परिवहन मंडळाची एक बस बंद पडली होती. त्या बसला धक्का मारून ती चालू करण्याचा प्रयत्न काहीं जण करीत होते. ते लोक ही बस ढकलत असतानाच मागून आलेल्या एका भरधाव वेगातील ट्रकने त्यांना धडक दिली. त्यात हे सहा जण जागीच ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. या घटनेबद्दल मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी तीव्र दुख: व्यक्त केले आहे. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना नियमानुसार त्वरीत आर्थिक मदत देण्याचा आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. या घटनेनंतर ट्रकचा चालक ट्रक तसाच टाकून पळून गेला आहे. त्याचा शोध जारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)