भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
पुणे,दि.12- भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर येथील मंतरवाडी पुलावर शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिथून मारुती कांबळे(32,रा.सत्यपुरम, फुरसुंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिथुन हा मंतरवाडी पुलावरुन चालला असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्याला ठोकरले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक जागेवर न थांबता निघुन गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारा पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)